Ad will apear here
Next
आदिवासींच्या कलेला ‘ट्राइब छत्री’चे कोंदण

पुणे : भारतातील आदिवासींच्या ६८० जमातींनी निर्मित केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात ‘ट्राइब छत्री’ प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली आहे. याचे उद्घाटन मेळघाटचे कोरकू दाम्पत्य बाजीराव कासदेकर, रिमाय बाजीराव कासदेकर आणि पूर्वांचलच्या विद्यार्थिनी मायसिलीन, चिची, मंजू, अफेन, आचीन यांच्या हस्ते करण्यात आले. 

या प्रसंगी ‘ट्रायफेड’चे डेप्युटी मॅनेजर एक. के. पंड्या, ट्राइब इंडियाचे सीनिअर असिस्टंट ऑफिसर पवन सोरेन, ‘भारतीय आदिवासी जीवनशैली’ आणि ‘बालमुद्रा’ या विषयातील ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे, पूर्वा परांजपे, संतोष महाडिक उपस्थित होते. पर्वती पायथा चौक येथे २७ जुलैला हा कार्यक्रम झाला. यावेळी कोरकू दांपत्य कासदेकर यांनी बांबू कलाकुसरीची माहिती दिली. श्रीकृष्ण परांजपे आणि पूर्वा परांजपे यांच्या पुढाकाराने केंद्र सरकार मान्यताप्राप्त हे प्रदर्शन पुण्यात सुरू झाले आहे. या ठिकाणी वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन व विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. 


या प्रदर्शनात कपडे, किचनमधील वस्तू, कलाकुसर आणि शोभेच्या वस्तू, शिल्पे, चित्रे, भेटवस्तू यांचा या प्रदर्शन केंद्रात समावेश आहे. देशाच्या विविध राज्यांतील आदिवासींकडून या वस्तू मागविल्या आहेत आणि उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात सावरा, प्रधान, कोरकू, माडिया, गोंड अशा आदिवासी जमातींचा समावेश आहे.


देशातील आदिवासींच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना उपजीविकेचे साधन मिळावे या हेतूने सुरू होणाऱ्या केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने या केंद्राला मान्यता दिली आहे. भावी काळात आदिवासी ज्ञानविषयक हे ‘नॉलेज सेंटर’ म्हणून विकसित करणार असून ‘ट्रायबल फूड’देखील उपलब्ध करून देणार असल्याचे परांजपे यांनी सांगितले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZEXCC
 Wish them good sale , rncouraging response in different
places , regular shows .
 Genuinely wonderful indeed . The efforts you are putting in to make original tribal art monumental is beyond appreciation.I heartily congratulate you both . Best wishes . I hope the constant , relentless energy you possess thru all these years would never leave you till you achieve your goal in this work. I have myself seen the heaps of files you display inyour computer may lead one day to erect a renowned museum of Tribal art and history.
Similar Posts
कलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात ‘ट्राइब छत्री’ पुणे : आदिवासी जीवनशैली आणि बालमुद्रा या विषयातील ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे आणि पूर्वा परांजपे हे ६८० भारतीय आदिवासी जमाती निर्मित कलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात ‘ट्राइब छत्री’ नावाने फ्रांचायझी आउटलेट सुरू करीत आहेत.
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
पुण्यात ‘जंगलम् मंगलम् चविष्टम्’ पुणे : जंगलात राहणारे आदिवासी, त्यांची जीवनशैली, खाद्यसंस्कृती याबद्दल जाणून घ्यायचे आहे, तर मग रविवारी, ३० सप्टेंबर रोजी ‘जंगलम् मंगलम् चविष्टम्’ या अनोख्या कार्यक्रमाला हजेरी लावा. पालघर जिल्ह्यातील जवाहर तालुक्यात काम करणाऱ्या ‘वयम्’ चळवळीने पुण्यात आदिवासी नृत्य, संगीत व खाद्यसंस्कृतीचा मिलाफ असणाऱ्या
माडिया भाषेतील पहिल्या पुस्तकाची निर्मिती पुणे : महाराष्ट्रातील गडचिरोली आणि छत्तीसगडमधील बस्तर भागातील आदिवासींच्या ‘माडिया’ भाषेतील लिखित स्वरूपातील पहिले पुस्तक पुणे विद्यापीठातील जर्मन भाषेच्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. मंजिरी परांजपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language